"कराडला विद्येचे माहेर घर म्हणले जाते, प्रत्येक माणसांत ते गुण असतात, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय ते होत नाही, कराडला शैक्षणिक क्षेत्रात मेडिकल कॉलेज, कृषी, आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सर्व प्रकारची कॉलेज आहेत, त्यात भाषणकलेची कमतरता होती ती सूर्यकांत पानस्कर सरांनी भरून काढली व मानाचा तूरा खवला असं म्हणण्यास काहीच हरकत नाही, सरांची बेधडक प्रशिक्षण देण्याची पद्धत सर्वांना भूरळ घालते."
मा. राजेंद्र माने, कराड शहर शिवसेना प्रमुख
मा. प्रा. विजय काटकर सर
'सांगली येथून प्रशिक्षणासाठी कराडला ७० कि. चा प्रवास झाला, परंतू या प्रशिक्षणामध्ये आल्यानंतर शब्द, आवाज, देहबोली हे बारकावे शिकायला मिळाले, हास्य रस, करुण रस, वीर रस कळाला त्यामुळे रस्त्यावरुन येता-जाता मुद्दामहून भाषणं ऐकण्याची सवय झाली, सरांनी एक कान मंत्र दिला तुमचं ऐकणं सुधारल तर तुमचं समजणं सुधारतं, व समजणं सुधारलं तर होणारे गैरसमज व वाद दूर होतात, व तो विषय समजायला सोपा जातो, याच फलित म्हणून सांगली जिल्हा भा.ज.पा. च्या समन्वयकपदी माझी निवड झाली, थोडक्यात जे झोपले आहेत त्यांना उठवण्याचं काम, उठलेले आहेत, त्यांना बसवण्याच काम व जे बसलेले आहेत त्यांना उभं करण्याच काम व जे उभे आहेत, त्यांना चालण्याच, जे चालतायेत त्यांना धावण्याचं व जे धावतायेत त्यांना जिंकून देण्याचं काम ग्लोबल व्यासपीठावर पानस्कर सरांकडून होत आहे एवढं निश्चित.'
"वैद्यकीय क्षेत्रामुळे समजाची नाळ जोडली, व समाजकार्याची आवड निर्माण झाली, काम करत असताना रोटरी क्लब सारख्या संस्थेमध्ये महत्वाची जबाबदारी येवून पडली, अचानक बोलण्याचे प्रसंग आले सुरुवातीला असं वाटत होतं की आपल्याला हे जमेल का, पण फेसबुकवर ग्लोबल व्यासपीठची अॅड आली, पुढचा मागचा विचार न करता क्लास जॉईन केला, पहिल्याच दिवशी सरांनी सगळ्यांची मनं जिंकली, व तूम्ही कोणीतरी नाही, तर कोणीतरी विशेष आहात याची जाणीव करुन आमचा माईंड सेटच बदलला, त्यानंतर बोलता बोलता कसे प्रभावी बोलायला लागलो हे कळलचं नाही, कारण पुन्हा आम्ही मागे पाहिलचं नाही, ग्लोबल व्यासपीठ अप्रतिम आहे."
मा. डॉ. शितल जाधव
मा. दिपाली जगदाळे, मराठा महासंघ उपाध्यक्षा
"भाषण करायच म्हणलं कि आपल्याला जमेल का? लोकं हसतील का? माझं चुकल का? मग चेहरा गंभीर होतो, भिती वाटते, छातीत धडधड होते, परंतु एकदा निश्चय केला की सर्व गोष्टी सोप्याच होतात हा विचार मनात धरुन ग्लोबल व्यासपीठ जॉईन आणि इथं आल्यावर लक्षात आलं "कोशीश करने वालों की हार नही होती" हे सूर्यकांत पानस्कर सरांच्या ट्रेनिंगमुळे शिकायला मिळालं, सुंदर आवाज, उत्कृष्ट सादरीकरण, वाक्यरचना कला, साहित्य, अभिनय याचा संगम म्हणजे ग्लोबल व्यासपीठ."
"कराड येथील लायन्स क्लब, इनरव्हील क्लब या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करत असताना नेहमी बोलण्याचे प्रसंग असतात, परंतु आम्ही नेहमी बोलणं टाळायचो, अगदी सुरुवातीला माईक सुद्धा पकडता येत नव्हता, अशातच कराड येथील ग्लोबल व्यासपीठची जाहिरात पाहिली, क्षणाचा विलंब न करता ग्लोबल व्यासपीठ जॉईन केले, सरांनी घेतलेले डीएनए प्रोग्राम, पॉवर पोजेस, आत्मविश्वासानं बोलण, शब्द, आवाज, बॉडीलँग्वेज सगळं जबरदस्त होतं, आम्ही शिकलो नंतर अल्पावधीतच मी ४० ते ५० ठिकाणी भाषण केली, माझी चांगली ओळख ग्लोबलमुळे निर्माण झाली, आज अनेक ठिकाणी सेलीब्रेटी म्हणून बोलवतात, याच श्रेय ग्लोबल व्यासपीठाचे आहे."
सुशांत व्हावळ
प्रा. बजरंग नलवडे
"शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना बोलण्याचा प्रसंग नेहमीच येतो, परंतु सामाजिक क्षेत्रातील बोलणं व शैक्षणिक बोलणं यात खूप फरक आहे, आणि हा फरक ग्लोबल व्यासपीठ, अनुभवायला मिळाला, हा कोर्स केल्यानंतर मी यशस्वी सूत्रसंचालक करतो आहे, अनेक कार्यक्रम केले तिथे लोकांनी दखल घेतली, थोडक्यात आत्ता असलेले तुम्ही, व तुम्हाला हवे असलेले तुम्ही यातला वक्तृत्वातला फरक अनुभवण्यासाठी ग्लोबल व्यासपीठ नक्की जॉईन करा."